जिल्ह्यात भाजपच्या 688 बूथ कमिट्या; पंतप्रधान मोदी साधणार थेट संवाद  

भाजप कोकण प्रभारी अतुल काळसेकर यांची माहिती 

रत्नागिरी:-  केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्या बरोबरच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भाजपाने राज्यभरात ‘समर्थ बुथ’ अभियान राबविले होते. त्याअंतर्गत जिल्ह्यात ८५२ पैकी  ६८८ बुथ कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सर्व बुथ कमिटी अध्यक्षांशी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ऑनलाईनपद्धतीने थेट संवाद साधणार असल्याची माहिती अभियानाचे कोकण प्रभारी अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष अड.दिपक  पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रात गेले सात वर्ष सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्य गरिब व  कष्टकरी जनतेसाठी विविध योजना राबविल्या आहेत. जनतेला थेट लाभ देणार्या योजना राबविण्यात आल्या. नवे उद्योजक तयार करण्याचे काम केंद्र सरकारने केले. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केंद्र सरकारने केली. त्यातून अनेकांनी आपले व्यावसाय उभे केले. जून बंद पडलेले उद्योग उभे करण्यासाठी शासनाने नवी योजना आणली आहे. कोरोना काळात मोफत धान्य, गरिबांना सिलेंडर आदी योजना राबविण्यात आल्या.
 केंद्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राम पातळीवर बुथ कमिट्या स्थापन करण्यासाठी ‘समर्थ बुथ’ अभियान राज्यभरात राबविण्यात आले. त्याअंतर्गत जिल्ह्यात ८५२ बुथ कमिट्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट होते.त्यापैकी ६८८ बुथ कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सर्व कमिट्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील सुमारे ९६ हजार बुथ कमिटी अध्यक्षांशी आज दि.७ सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान श्री.नरेंद्र मोंदी सर्व बुथ कमिटी अध्यक्षांशी संवाद साधणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.
भविष्यात होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणूका, तसेच येत्या काही माहिन्यांनी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यावेळीही बुथ कमिट्यांच्या उपयोग भाजपला होणार आहे. भविष्यातील सर्व निवडणुका भाजपा जिंकणार असल्याचे श्री.काळसेकर यांनी सांगितले.