रत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा तारखेप्रमाणे मंगळवार सहा जून रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत ध्वज उभारुन महाराजांना रयतेच्यावतीने मानवंदना देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा तिथीप्रमाणे नुकताच साजरा झाला. यानिमित्त रत्नागिरीत विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. तारखेप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी रायगडावरही शिवप्रेमींची गर्दी झाली होती.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. ग्रामविकास मंत्रालयाकडून याबाबत सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबाबत माहिती देण्यात आली होती.
हा ध्वज उभारुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साह दिसून आला.