रत्नागिरी:- शैक्षणिक गुणवत्तावाढीत येणार्या अडथळ्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) यांच्या संयुक्त विद्यमान प्रगत शैक्षणिक रत्नागिरी उपक्रम राबविण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी जिल्हा परिषद शाळांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये शिक्षण सभापती श्री. मणचेकर यांनी डाएट प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शैक्षणिक कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्र, राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरुन सुरु असलेले महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. गुणवत्ता वाढविण्यासाठी कराव्या लागणार्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रगत शैक्षणिक रत्नागिरी ही संकल्पना राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यामध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या क्षेत्रीयस्तरावर काम करणार्या अधिकार्यांच्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेऊन त्यांना पुढील उपक्रमांची अंमलबजावणी करण्याकरिता प्रेरणा दिली जाईल. शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या शैक्षणिक कामाला गती देण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकासात येणार्या अडथळ्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येतील. शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांची तालुकानिहाय गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या पर्यवेक्षी यंत्रणेसोबत प्रत्यक्ष बैठक घेण्यात येईल. त्यात केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी 2020-21 आणि 2021-21 या शैक्षणिक वर्षांमधील कामकाजाचे सादरीकरण करतील. यामध्ये शिक्षण सभापती सर्वांशी चर्चा करतील आणि भविष्यातील नियोजन करतील. तालुक्यातील संवाद बैठकीनंतर शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये येणार्या अडथळ्यांचा शोध घेऊन शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये क्षेत्रीय अधिकार्यांची फळी बळकट करता येईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना प्रेरित करण्यात येईल आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाइभ् उपाययोजना आखल्या जातील. यामध्ये दरमहा तालुकानिहाय शैक्षणिक गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा मिळत राहील, जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर समजण्यास मदत होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग तयार होईल.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रगत शैक्षणिक रत्नागिरी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अधिकार्यांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांना समाविष्ट करुन घेतले जाईल.
– डॉ. गजानन पाटील, प्राचार्य डाएट