जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली; निगेटिव्ह अहवालांची संख्या वाढली

24 तासात 339 पॉझिटिव्ह तर 1692 निगेटिव्ह अहवाल; 32 मृत्यूंची नोंद

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 339 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 169 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 170 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1692 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 339 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 31 हजार 622 झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 32 मृत्यूंची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी 486 तर सोमवारी 259, मंगळवारी 345, बुधवारी 343 तर गुरुवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 339 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 169 रुग्ण आरटीपीसीआर तर 170 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 31 हजार 622 वर जाऊन पोहचली आहे. 

मागील 24 तासात 1692 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 559 जणांपैकी 390 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1133 पैकी 1353 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 32 मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 992 बळी गेले आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.13% आहे.