रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही तासात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वीच हवामान विभागाने रत्नागिरीत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यानुसार स्थानिक प्रशासनाकडून पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याची सूचना जिल्ह्यातील नागरिकांना केली आहे. ऐन गर्मीच्या मोसमात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार चिंतातुर आहे. जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून उकड्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच पाऊस पडल्यास आंबा पीक अडचणीत येण्याची शक्यता आहे.