रत्नागिरी:-/जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून दमदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. काही भागात सुरुवातीच्या वेळेलेला पेरा मोठा झाल्याने आता लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे पडल्याने नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी-लांजा महामार्गावर नवीन काँक्रीटच्या रस्त्याला खड्डे पडल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे आल्या आहेत.
मागील चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच ठेवली आहे. उष्णतेच्या झळांनी त्रासलेल्या नागरिकांना पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने हायसे वाटले आहे. जिल्ह्यात शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पेरणीचे पेरे मोठे झाल्याने,आता लावणीच्या कामालाही वेग आला आहे. जिल्ह्यात दोन-तीन ठिकाणी झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. यात दापोलीतील जि.प. शाळा किरंबा येथे संरक्षण भिंत कोसळल्याने सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी ते लांजा दरम्यान काँक्रीट रोडला खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.