रत्नागिरी:- जिल्ह्यातही सरासरीत पंच्याहत्तरी गाठली आहेे. आतापर्यंत पावसाने जिल्ह्यात 2600 मि.मीच्या सरासरीने 23 हजारची मजल गाठली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असताना गुरुवारी नारळी पौण्ििमेला 52.67 मि.मी. च्या सरासरीने दिवसभरात 447 मि. मी. एकूण पाऊस झाला. ढगाळ वातावरणात अधूनमधून पडणार्या जोरदार सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे तापमानातही घट झाली. जिल्ह्यात गुरुवारी तापमान 26 अंश सेल्सियस नोंदविले गेले. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने अडीच हजार मि.मी.ची सरासरी गाठली असून आतापर्यंत पावसाने 75 टक्के सरासरी पूर्ण केली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2600 मि.मी.च्या सरासरीने 23339.50 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद लांजा तालुक्यात साडेचार हजार मि. मी. इतकी झाली आहे. सर्वात कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात झाला आहे. पाच तालुक्यात पावसाने अडीच हजार मि. मी. चा टप्पा पूर्ण केला आहे. तर उर्वरित दोन तालुक्यात पावसाने दोन हजार मि.मी.ची मजल गाठली आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने 3174 मि.मी.च्या सरासरीने तीस हजार मि.मी.ची मजल गाठली होती. या कालवाधीत पावसाने जिल्ह्यातील 100 टक्के सरासरी पूर्ण केली होती. मात्र, यंदा पाऊस आतापर्यंत पंच्याहत्तरीमध्ये रेंगाळत आहे.