रत्नागिरी:- कोरोनामुळं मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून अनलॉक झाल्या असून, ५वी ते ८वीचे वर्ग सुरु झाले आहेत. शाळा पुन्हा सुरु झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. मागील ९ ते १० महिन्यांपासून या शाळा बंद होत्या.
शासनाने पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात 1400 शाळा असून सुमारे 80 हजार विद्यार्थी आहेत. यापैकी काहीच शाळा गुरुवारी सुरू झाल्या. ज्या भागातील शाळांमधील पालकांनी संमतीपत्रे दिली त्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. तसंच, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी देखील करण्यात आली.दुसरीकडं शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचं नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तारावर ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये तसेच, सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. महापालिकेनंही आरोग्य केंद्रांमध्ये सोय केली आहे. मोठ्या संख्येनं शिक्षक असलेल्या शाळांमध्ये आरोग्य कर्मचारी स्वत: भेट देत आहेत.