रत्नागिरी:-मंगळवारी आलेल्या अहवालानुसार करण्यात आलेल्या 3 हजार 214 कोरोना चाचण्यांमध्ये 83 पॉझिटिव्ह रुग्ण भेटले आहेत. तर 3 हजार 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 55 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 715 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96 टक्के आहे. नव्याने 83 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 827 इतकी झाली आहे.
कोरोनाने 24 एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 418 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 403 तर संस्थात्मक विलगीकरणात 291 रुग्ण उपचार घेत आहेत.