रत्नागिरी:- जिल्ह्यात सातत्याने कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात नव्याने 70 रुग्णांची भर पडली आहे. यानंतर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 3345 वर पोहोचली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 11, रायपाटण 03 तर ॲन्टीजेन टेस्टमधील रत्नागिरी 15, राजापूर 03, कामथे 23, खाजगी लॅब 15 अशा एकूण 70 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान जिल्ह्यात कोरोना बळींची संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज चिपळूणमधील 3 रुग्णांचे मृत्यू झाले असून त्यामध्ये पुरुष रुग्ण वय 48, पुरुष रुग्ण वय 45, पुरुष रुग्ण वय 62 या कोरोनाबळींचा समावेश आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 121 झाली आहे.









