रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 50 नवीन कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1931 झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये सातत्याने पडणारी भर जिल्हावासीयांच्या चिंतेत टाकणारी आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी 11,ॲन्टीजेन टेस्ट 3, कामथे 22, कळंबणी 13, लांजा 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.