रत्नागिरी:-जिल्ह्यात नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 364 आणि त्यापूर्वीचे 59 असे एकूण 423 नवे पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.87 टक्के आहे. तर याच कालावधीत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवस रुग्णसंख्या नियमितपणे 500 च्या दरम्यानच आहे. शुक्रवारी साडेचार हजार चाचण्या करण्यात आल्या. यात यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 179 तर अँटीजेन चाचणी केलेले 185 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. 24 तासात 4 हजार 259 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर याच कालावधीत 388 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यात 7, राजापूर 3, लांजा 1, खेड 1, चिपळूण 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 3 मृत्यू झाले आहेत. 16 जणांच्या मृत्यूंमुळे जिल्ह्याचा मृत्युदर 2.86 टक्क्यांवर पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 805 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.









