रत्नागिरी:- जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने घटत असताना दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या मात्र सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात नव्याने 17 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 24 तासातील 3 तर यापूर्वीचे 14 मृत्यू आहेत. 24 तासात नव्याने 134 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
नव्याने 134 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 हजार 557 इतकी झाली आहे. 24 तासात 97 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 70 हजार 587 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीचे प्रमाण 94. 68 टक्के आहे.
जिल्ह्यात नव्याने 17 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 17 पैकी 24 तासातील 3 तर त्यापूर्वीचे 14 असे 17 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 232 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.99 आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 949 तर संस्थात्मक विलीकरणात 411 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात लक्षण नसलेले 1 हजार 364 तर लक्षण असलेले 130 असे एकूण 1 हजार 694 रुग्ण उपचार घेत आहेत.









