रत्नागिरी:- मागील 24 तासात 147 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 147 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 हजार 423 इतकी झाली आहे. 24 तासात 288 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 70 हजार 490 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात नव्याने 7 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 7 पैकी 24 तासातील 5 त्यापूर्वीचे 2 असे 7 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 215 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.98 तर रिकव्हरी दर 94.72 टक्के आहे. 24 तासात 5 हजार 157 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून आता पर्यंत 6 लाख 11 हजार 188 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 844 तर संस्थात्मक विलीकरणात 723 रुग्ण उपचार घेत आहेत.