रत्नागिरी:-जिल्ह्यात नव्याने 540 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 6 हजार 743 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 20 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने 540 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 59 हजार 56 इतकी झाली आहे. बुधवारी 6 हजार 743 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता पर्यंत 3 लाख 38 हजार 650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 179 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 51 हजार 162 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 86.63 टक्के आहे.
नव्याने 540 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 465 पैकी 246 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 3 हजार 70 पैकी 163 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 24 तासात 6 हजार 743 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 409 तर त्यापूर्वीचे 131 असे 540 जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 7.39% आहे.