रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 590 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 6 हजार 826 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 6 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने 590 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 58 हजार 516 इतकी झाली आहे.
बुधवारी 6 हजार 826 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता पर्यंत 3 लाख 31 हजार 907 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 429 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 50 हजार 983 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 87.12 टक्के आहे.
नव्याने 590 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 311 पैकी 317 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 3 हजार 716 पैकी 199 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 24 तासात 6 हजार 27 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 416 तर त्यापूर्वीचे 74 असे 590 जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.36% आहे.