जिल्ह्यात दहा हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी:- आगामी काळात यावर्षी पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद स्तरावरून दरवर्षी दिवाळीनंतर गतीमान केली जाणारी ‘मिशन बंधारे’ मोहिम यावेळेस दसऱयापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींना पति 10 बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे.

डिसेंबर, जानेवारी महिन्यांपासून पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी अडवून व जिरवून बोअरवेल, विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्याकरिता तसेच पाण्याचा शेती व गुरांना पिण्याकरिता उपयोग होत असतो. तसेच नदी, नाले, ओहोळ, प-यावर छोटे-मोठे कच्चे, वनराई, व विजय बंधारे बांधल्यास मोठया प्रमाणात फायदा होऊन पाणी टंचाईच्या काळात दुर्भिक्ष टाळता येते. त्यासाठी प्रत्येक ग्रा.पं.ने किमान 10 वनराई/कच्चे/विजय बंधारे नदी, नाले, ओहोळ येथे बांधून पाणी अडवणे व जिरवणे गरजेचे असल्याचे उद्दीrष्ट ठेवण्यात आले आहे.
यावर्षीच्या पावसाळी हंगाम पाहता जिल्ह्dयात पर्जन्यमान देखील सर्वसाधारण राहिलेले आहे. या हंगामात मोठ्या पमाणात पावसाने खंड दिला होता. त्याचा परिणाम अनेक भागात कमी अधिक पर्जन्यमान राहिलेले आहे. या हंगामातील पर्जन्यमान पाहता जिल्ह्dयात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 98 टक्के इतके पर्जन्यमान झालेले आहे. तर एकूण 3 हजार 141.4 मिमि इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. इतके पर्जन्यमान झालेले असले तरी वाढते तापमान आणि झपाट्याने खालावणाऱया पाण्याच्या पातळीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. आता तर पाउस महाराष्ट्रातून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे पशासन यंत्रणेने पाणी टंचाई निवारणासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
दरवर्षी जिल्हा परिषद स्तरावरून हाती घेतली जाणारी ‘मिशन बंधारे मोहिमेला दिवाळीनंतरच पारंभ होत असतो. पत्येक ग्रामपंचायतीला किमान 10 कच्चे, वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात येते. गेल्या दोन वर्षात जिल्ह्dयातील गावागावात पाणी योजनांचे कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे लोकसहभागातून बंधारे उभारण्याकडील लोकांचा कल कमी होत असल्याची बाब गतवर्षी समोर आली होती. पण यावर्षीच्या हंगामात ही ‘मिशन बंधारे’ मोहिम दिवाळीनंतर नव्हे तर दसऱयापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पशासनाने पत्येक तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्येकी 10 बंधारे बांधावेत अशा सूचना केलेल्या आहेत. तालुकास्तरावर ही मोहिम पभावीपणे राबवण्यासाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा गतीमान झालेली आहे. संगमेश्वर, गुहागर सह अन्य तालुक्यातही 4 ते 5 बंधारे बांधण्याचा पार्रभ झालेला आहे. ही मिशन बंधारे मोहिम जि.प.कृषी विभागाने हाती घेतली आहे.