रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात तीन दिवस जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
२७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी, २ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री संपूर्ण दिवस बंद राहतील.
गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिंह यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामधे कसूर केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.









