रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने चोवीस तासातील उच्चांक गाठला आहे. मागील चोवीस तासात तब्बल 201 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 268 वर पोचली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 153 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र मागील चोवीस तासात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण सापडून आले आहेत. चोवीस तासात दोनशेपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची पहिलीच वेळ असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चोवीस तासात जिल्ह्यात 201 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 214 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत 26 हजार 184 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी तब्बल 134 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3 हजार 260 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 61.88 टक्के इतके आहे.
दरम्यान चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा 153 वर पोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण 2.90 टक्के आहे.