रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोना बाधित रुग्णसंख्येने दिडशेचा टप्पा ओलांडला आहे. चोवीस तासात कोरोनाचे 152 बाधित रुग्ण सापडले आहेत. यात 86 आरटीपीसीआर तर 66 अंटीजेन टेस्ट केलेल्या रुग्णांचा समावेश आहे.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोना बाधित पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील, खेड तालुक्यातील 2 तर चिपळूण तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 187 वर पोचली आहे.
मागील 24 तासात सापडलेल्या रुग्णांमध्ये दापोलीतील 3, खेड 11, गुहागर 14, चिपळूण 37, संगमेश्वर 17, रत्नागिरीतील 40, लांजा 11 आणि राजापूर तालुक्यातील 19 रुग्णांचा समावेश आहे.









