रत्नागिरी:- जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटत आहे. मागील चोवीस तासात 63 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर केवळ 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंतच्या 24 तासांत एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने आलेल्या अहवालानुसार दापोली 2, चिपळूण 4 आणि रत्नागिरी तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 459 वर पोहोचली आहे.
शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 63 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 810 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी 21 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 8 हजार 459 पैकी 7 हजार 901 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 93.40 टक्के आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.









