रत्नागिरी:- जिल्ह्यात प्रथमच कोरोना बाधितांची संख्या तीनशेपार पोहोचली आहे. 24 तासात 1 हजार 804 अहवालांमध्ये तब्बल 304 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 165 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 195 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 77 हजार 969 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.45 टक्के आहे. नव्याने 304 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 81 हजार 683 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 946 तर संस्थात्मक विलगीकरणात 228 रुग्ण उपचार घेत आहेत.