रत्नागिरी:- शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल 23 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात यापूर्वीचे 21 तर 24 तासातील 2 अशा मृत रुग्णांची नोंद आहे. नव्याने 401 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 65 हजार 850 इतकी झाली आहे.
शुक्रवारी 4 हजार 972 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 4 लाख 26 हजार 445 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात 1 हजार 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता पर्यंत 58 हजार 906 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर 89.79 टक्के आहे.
जिल्ह्यात नव्याने 23 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात 24 तासातील 21 तर यापूर्वीचे 2 अशा 23 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात तब्बल 9, राजापूर 5, लांजा 5, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 860 मृत्यू तर जिल्ह्याचा मृत्युदर 2.82 टक्के इतका आहे.









