रत्नागिरी:- शनिवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल 30 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात यापूर्वीचे 27 तर 24 तासातील 3 अशा मृत रुग्णांची नोंद आहे. नव्याने 473 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 66 हजार 041 इतकी झाली आहे.
शनिवारी 5 हजार 248 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 4 लाख 31 हजार 693 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात 396 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 59 हजार 302 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर 89.80 टक्के आहे.
जिल्ह्यात नव्याने 30 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात 24 तासातील 27 तर यापूर्वीचे 3 अशा 30 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात तब्बल 17, दापोली 6, राजापूर 2, चिपळूण-2, संगमेश्वर, गुहागर आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 890 मृत्यू तर जिल्ह्याचा मृत्युदर 2.86 टक्के इतका आहे.