रत्नागिरी:- जिल्ह्यात चौथ्या लाटेतील पहिला कोरोना बळी गेला आहे. एकुण बळींची संख्या आता २ हजार ५३७ झाली असून दिवसभरात जिल्ह्यात नवे १० रुग्ण सापडले असून तर ११ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी जास्त होत आहे. शुन्यावर असलेली ही संख्या मधल्या काळात २८ पर्यंत गेली होती. आता पुन्हा ही संख्या कमी झाली आहे. चौथ्या लाटेची ही सुरवात असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशाऱा दिला होता. तिसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र आज रत्नागिरी तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आजवर मृत्यू झालेल्यांची संख्या २ हजार ५३७ असून मृत्यूदर २.९८ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४३३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४२२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दिवसभरात ११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ८२ हजार ४०४ जण बरे झाले असून बरे होण्याचे हे प्रमाण ९६.९३ टक्के आहे. जिल्ह्यात ७२ अॅक्टिव्ह रुग्ण असून ५२ गृह विलगिकरणात तर १० संस्थात्मक विलगिकरणात आहेत.