जिल्ह्यात कोरोनाचे 79 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- मागील काही दिवस तुलनेने कमी रुग्ण सापडत असल्याने दिलासा मिळालेला असताना बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 79 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. याशिवाय उपचारा दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या तीनशे नजिक पोचली आहे. दरम्यान चोवीस तासात जवळपास साडेपाचशे जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 

मागील काही दिवस कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले होते. जिल्ह्यात केवळ 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते तर मंगळवारी केवळ 26 बाधित रुग्ण सापडले होते. मात्र बुधवारी कोरोना बाधितांचा आकडा वाढून 79 वर पोचला आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये खेड 5, गुहागर 1, चिपळूण 27, संगमेश्वर 6, रत्नागिरी 11, लांजा 26, दापोली 2 आणि मंडणगड तालुक्यात 1 रुग्ण सापडला आहेत.

मागील 24 तासात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू संख्या 298 वर पोचली आहे. सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात 80, खेड 49, गुहागर 11, दापोली 32, चिपळूण 73, संगमेश्वर 31, लांजा 10, राजापूर12 आणि मंडणगड तालुक्यात 2 मृत्यू झाले आहेत. 
 

मागील चोवीस तासात 532 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आता पर्यंत 44 हजार 93 अहवाळ निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी 59 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आता पर्यंत 7 हजार 274  जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.31 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 3.65 टक्के आहे.