रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 21 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 181 रुग्ण उपचारखाली आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 34 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 211 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.64 टक्के आहे. नव्याने 21 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 864 इतकी झाली आहे.
मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 472 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.13 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 85 तर संस्थात्मक विलीगिकरणात 96 रुग्ण उपचार घेत आहेत.









