जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटती; मृत्यूसंख्या स्थिर

रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत घटतीच असली तरी मृत्यूसंख्या मात्र स्थिर आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1853 तपासण्यांमध्ये 185 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात उपचाराखाली असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 141 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 79 हजार 914 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.59 टक्के आहे. नव्याने 185 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 83 हजार 601 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 511 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.00 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 782 तर संस्थात्मक विलगीकरणात 349 रुग्ण उपचार घेत आहेत.