जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच; 24 तासात 563 कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सलग दुसर्‍या दिवशी पाचशेहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 563 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 563 पैकी 298 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 265 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 563 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 18 हजार 609 झाली आहे. आज तब्बल 23 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 217 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 563 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 18 हजार 609 वर जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 298 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 265 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 23 रुग्णांचा बळी गेल्याची नोंद आज झाली असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 552 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.96 % आहे. आज जिल्ह्यात 217 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 13,039 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 70.06 टक्के आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 563 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 165, दापोली 48, खेड 29, गुहागर 103, चिपळूण 120, संगमेश्वर 65, मंडणगड 5, राजापूर 17 आणि लांजा तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 13.42% आहे.