रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात केवळ 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पाच तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडून आलेला नाही.
जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस रुग्ण सावडण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने घटत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंडणगड आणि दापोली तालुक्यात प्रत्येकी 3 तर रत्नागिरी 11 आणि चिपळूण तालुक्यात केवळ 1 रुग्ण सापडला आहे. खेड, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यात 24 तासात एकही रुग्ण सापडलेला नाही.
गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 161 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 46 हजार 617 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी 15 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 8 हजार 289 पैकी 7 हजार 639 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 92.15 टक्के आहे.