जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी असलेल्या दोन नोंदी सापडल्या

रत्नागिरी:- मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगेपाटील यांच्या मागणीनंतर संपूणं महाराष्ट्र राज्य शासन कामाला लागले असून, प्रत्येक जिल्ह्यातून कुणबी मराठा नोंदी मागवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात कुणबी मराठयांच्या दोन नोंदी आढळल्या असून अभिलेखांच्या ऐवजांची छाननी सुरु झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 17 हजारहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या असून कुणबी मराठाची दोन नोंदी असल्याची माहिती पुढे आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यापासून एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली आहे. त्यानंतर मराठावाड्यातील दस्तऐवज तपासण्यात आले. यात हजारो कुणबी मराठा नोंदी आढळल्या आहेत. अशा लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी मराठा नोंदीची माहिती तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बैठकीत देण्यात आली होती.
या नोंदी तपासण्याबाबत जवळपास संपूर्ण दिवस ‘व्हिसी’ पार पडली.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बैठक घेऊन नोंदी तपासणीबाबत आदेश दिले होते. जिल्ह्यात त्यामुळे दस्ताऐवज तपासणी सुरु झाली आहे. जिल्ह्यात दापोली तालुक्यात पोफळवणे आणि कांगवई या दोन गावांमध्ये कुणबी मराठा नोंद आढळून आली आहे
जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा तालुक्यात आतापयर्र्त साडेनऊशेहून अधिक गावातील अभिलेखांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. आतापयर्र्त 17 हजारहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

जिल्ह्यात कुणबी मराठा दोन नोंदी
जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी तपासण्यात येत आहेत. दापोली तालुक्यात दोन नोंदी आढळल्या आहेत. सर्व तहसीलमधील अभिलेख तपासण्याचे काम वेगाने सुरु आहे. 1910पासून उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील नोंदी तपासण्यात येत आहेत.
एम. देवेंदर सिंह
जिल्हाधिकारी, रत्नागिरी