रत्नागिरी:-महिना उलटून गेला तरी एसटी कर्मचारी विशेषत: चालक वाहक हजर होण्याची संख्या अत्यल्प आहे. आतापर्यंत केवळ 594 कर्मचारी हजर झाले आहे. संप मागे घेण्याची कोणताही निर्णय झालेला नसून 20 डिसेंबरनंतरच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेल्या तीन चार दिवसापासून दररोज 49 बसेस जिल्ह्यात सुरु आहेत.
एसटी कर्मचारी संप मागे घेत नसले तरी आता खाजगी वाहतूकीच्या मदतीने नागरिकांनी आपले दैनंदिन कामकाज सुरु केले आहे. शाळा कॉलेजही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांचा लाल परीवर विश्वास असला तरी कर्मचार्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निराशा निर्माण झाली आहे. सोमवारी हजर होण्यासाठी निलंबित झालेल्या कर्मचार्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र, 216 निलंबनापैकी केवळ 1 कर्मचारी हजर झाला त्यामुळे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य कर्मचार्यांचे मिळाले नाही. सोमवारी कामावर हजर झाल्यास निलंबन मागे घेण्यात येणार होते. मात्र, एकच कर्मचारी हजर झाला.