जिल्ह्यात आणखी 62 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 2210

रत्नागिरी:-जिल्ह्यात रोज कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. प्राप्त अहवालात जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2210 झाली आहे.

आता सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी 4, कामथे 44, लांजा 1, गुहागर 4, दापोली 5, अँटिजेन 4 असे जिल्ह्यातील एकूण 62 जणांचा समावेश आहे.