रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत असले तरी बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याची संख्या मात्र वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा 256 वर गेला आहे. याशिवाय मागील 24 तासात 85 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
नव्याने सापडलेल्या 85 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 35 जण आरटीपीसीआर तर 10 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. सर्वाधिक 30 रुग्ण चिपळूण तर चिपळूण तालुक्यात 25 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 9, गुहागर 7, संगमेश्वर 10, लांजा 1 तर राजापूर तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान मागील चोवीस तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 256 वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या सहा रुग्णांमध्ये खेड मधील 3 तर लांजा, चिपळूण आणि दापोली मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.









