जिल्ह्यात आणखी 48 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 2064

रत्नागिरी:- जिल्ह्यात आज उशिरा मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2064 झाली आहे.

कालपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी 14, कामथे 10, कळंबणी 19, दापोली 2, देवरुखमधील एका रुग्णाचा समावेश आहे.