जिल्ह्यात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी:- जिल्ह्यात आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात ३० हजाराहून अधिक ठिकाणी खासगी घटस्थापना होणार आहेत. तसेच ४४७ ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासनाने काही निर्बंध घातल्याने यावर्षी रास, गरबा, दांडिया नसल्याने तरूणाईचा हिरमोड झाला आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला आज घटस्थापना केली जाणार असल्याने झेंडुच्या फुलानी बाजारपेठ सजली आहे. अनेक ठिकाणी देवीच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी मंडप सजले आहेत. आज देवींच्या मुर्तींची मिरवणुक काढून त्यांची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३६४ ठिकाणी देवींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. ९२ ठिकाणी फोटो पुजन, ३७ हजार ५५९ ठिकाणी खासगी तर २४९ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात आली होती. यावर्षी ३९५ सार्वजनिक, ५२ खासगी ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तर ३० हजार २५० खासगी, तर २२७ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाऊन मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळी संध्याकाळी आरती, अशा परकारे घरोघरी घटस्थापना होत असते.
दुर्गामातेच्या विविध रुपांतील मु्ती बनवण्याची मुर्तीशाळांतूनही मोठी लगबग असते. मात्र ती आता संपली आहे. आज देवीच्या मुर्ती वाजतगाजत उत्सवाठिकाणी मिरवणुकीनी येतात. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, स्पर्धाचे नियोजन केले जाते. नऊ दिवस दांडिया, गरबा कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने दांडिया स्पर्धेशिवय नवराभोत्सव साजरा करावा लागणार आहे. नवरात्रोत्सव साजरा करण्यावरही बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांच्या आधित राहून यावर्षी रास, गरबा, आणि दांडिया स्पर्धेशिवाय नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे.