जिल्ह्यात अवघे 3 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; 100 जणांचे अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात केवळ 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 100 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने 3 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 568 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 50 हजार 560 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात तब्बल 8 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 93 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.45 टक्के आहे.