रत्नागिरी:- रत्नागिरी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा शासकिय रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे , डॉ. परिमल गोडे, डॉ. निलोफर डोंगरकर, प्रभाकर कांबळे, लायन क्लब आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये आज सकाळी 08 ते संध्या. 05 पर्यंत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांकरिता पल्स पोलिओ लसीकरण आज मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे. पल्स पोलिओ मोहीमेत जिल्ह्यातील एकूण 83 हजार 264 बालकांना ही लस देण्यात आली. त्यासाठी एकूण 1910 बुथ स्थापन केली होती. त्याचबरोबर 35 ट्रान्झीट टीम रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे नियुक्ती केली असून 112 मोबाईल टीम आहेत. त्याचबरोबर 4 हजार कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत होते.