जिल्ह्यातील 516 गावठाणांचे स्वतंत्र सर्वेक्षण सुरू

रत्नागिरी:-जिल्ह्यातील 516 गावठाणांचे भूमी अभिलेख विभागामार्पत स्वामित्व योजनेंतर्गत ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्वारे सर्वेक्षण सुरू आहे. आजपर्यंत मंडणगड, रत्नागिरी, लांजा, व संगमेश्वर या चार तालुक्यातील 160 गावठाणांचे ‘ड्रोन सर्वेक्षण’ पूर्णत्वास गेलेले आहे. या सर्वेक्षणामुळे जमिन मोजणी कामात अचुकता व सुसूत्रता येणार आहे.

जिह्यातील 516 गावांचे भूमी अभिलेख विभागामार्पत स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यात पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्चित करून गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक तालुक्यातील गावे निश्चित केली आहेत; मात्र मंडणगड, दापोली तालुक्यात सर्वांत जास्त गावे आहेत. शासनाकडून ड्रोन कॅमेरा भूमी अभिलेख विभागाला पदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व गावांच्या गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 516 गावांचा समावेश असून त्याचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने त्यावर काम केले असून जिह्यातील या गावांची निवड केली आहे. समुद्रसपाटीपासून गावाची उंची व ठिकाण तसेच अन्य अनुषंगिक मुद्यांच्या आधारे तपासणी झाल्यानंतर ड्रोन कॅमेरा सर्वेक्षणासाठी गावांची निवड केली आहे.

ड्रोन सर्वेक्षणाच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय कामाचे नियोजन आहे. निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन ड्रोन सर्वेक्षणासंदर्भात माहिती देऊन प्रत्यक्ष काम सुरू आहे. गावातील नद्या, ओढे, नाले, रस्त्याचे चित्रीकरण व सर्वेक्षण करून मोजणी केली जाणार आहे. नद्यानाल्यांची, रस्त्याची जागा ठरवून दिली जाणार आहे. यामुळे गावातील वाद कमी होणार आहेत. भूमी अभिलेख विभागाचे काम पूर्वी जुन्याच पद्धतीने होत असल्याने त्याला खूप वेळ लागतो. शिवाय जास्त मनुष्यबळ व खर्चही व्हायचा. जुन्या मोजणी पद्धतीमध्ये विविध भागांचे नकाशे व दस्तावेज सोबत घ्यावे लागायचे. हे काम सुरू असताना नागरिक व भूमि अभिलेखच्या अधिकाऱ्यांमध्ये वादही होण्याचे प्रकार घडत असतात. त्यासाठी शासना महाराष्ट्रातील सर्व गावांच्या गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

रत्नागिरी जिल्ह्dयातील सर्व गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. या सुरू झालेल्या कार्यवाहीत जिल्ह्dयात आतापर्यंत 516 गावठाणांपैकी 160 गावठाणांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये मंडणगड 105, रत्नागिरी 23, लांजा 2, संगमेश्वर 15 गावठाणांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. तर चिपळुणमधील 90 गावांत ड्रोन सर्वेक्षण सुरू पैकी 15 गावठाणे पूर्ण झाली आहेत. अजून गुहागर, खेड, दापोली तालुक्यातील गावठाणांचे लवकरच सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा भूमिअभिलेख विभागामार्पत सांगण्यात आले