रत्नागिरी:- जिल्ह्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामातील भात विक्री केली होती. अशा ई- नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील 5 हजार 622 शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपयांप्रमाणे बोनस जाहीर केला असून, जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यामध्ये एकूण 26 कोटी 25 लाख 90 हजार रुपये जमा करण्यात आले.
भात खरेदीचा दर अठरा रुपयापर्यंत होता. तेव्हा पाचशे रुपये बोनस पद्धत चालू झाली. आता शेतकर्यांना भातासाठी दोन हजार चाळीस असा समाधानकारक दर मिळत असून, प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देणार आहे. ज्या शेतकर्यांनी नोंदणी करून भात विक्री केली आहे, अशा शेतकर्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे.
दोन हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त तीस हजार बोनसची मर्यादा आहे. जिल्ह्यातील 5 हजार 621 शेतकर्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे.