जिल्ह्यातील 3 हजार 198 रिक्षा चालकांना मिळणार पहिल्या टप्प्यात आर्थिक मदत

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात निराधार, रिक्षा व्यावसायिक यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दीड हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातील १० हजार ९९२ रिक्षा चालकांपैकी ३ हजार १९८ रिक्षा चालकांच्या प्रस्तावला येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. तर ८८० प्रकरणे कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तर १७ प्रकरणे कायमस्वरुपी रद्द करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयाकडे २७ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. लकरच रिक्षा चालकांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या व्यवसायावर गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना आा|थक मदत म्हणून दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी पोर्टल विकसित करून त्याद्वारे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ४०९५ रिक्षा मालकांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. त्यातील ३१९८ रिक्षा चालकांचे अर्ज परिपुर्ण असल्याने त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी शिफारस आरटीओ कार्यालयाने केली आहे. तर ८८०रिक्षा चालकांच्या प्रस्तावत त्रुटी असल्याने ती रिजेक्ट करण्यात आली आहेत. त्यांना पुन्हा परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. तर १७ प्रकारणे कायमस्वरुपी रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये रिक्षा जिल्हा बाहेर गेल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.