जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतीमधील 274 रिक्तपदांसाठी पोटनिवडणुका

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतीमधील 274 रिक्तपदांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. त्यामुळे जिल्हाभरात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण पहालया मिळणार असून महाविकास आघाडी विरुध्द भाजपा असे चित्र निर्माण होऊ शकते.

मंडणगड, दापोली नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणुकाही येत्या दोन-तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. नगर पंचायत, नगर पालिकेपुर्वी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात 186 ग्रामपंचायतीमधील 274 जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत 4 व 5 डिसेंबरची सुट्टी वगळून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या निवडणुका 21 डिसेंबरला होणार असून 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागापासूनच निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्हा ढवळून निघणार आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडीने आता ग्रामीण भागापासून तयारी सुरु केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुढील काळात अधिक घट्ट होते. की स्वतंत्र लढून प्रत्येक पक्षाची ताकद आजमावली जाते हे लवकरच दिसून येणा आहे.