रत्नागिरी:-शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला 15 जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. मात्र आज आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील 1 लाख 26 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेसाठी पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यासाठी शासनाकडे पुस्तकांची मागणी केलेली आहे. आठवडाभरात पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर त्याचे प्रत्येक तालुक्यांना वितरण होणार आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या या कामकाजाला 15 जूनपासून प्रारंभ झालेला आहे. जिल्ह्यात एकूण 75 हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शैक्षणिक सत्राचा पारंभ होणार आहे. शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. रत्नागिरी जि.प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे.
जिल्ह्यात या योजनेंतर्गत 1 लाख 13 हजार 153 विद्यार्थ्यांसाठी 6 लाख 30 हजार 833 पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्राला 15 जूनपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांकडे अद्याप पाठ्यपुस्तके नसल्याने ती कधी मिळणार याकडे लक्ष वेधलेले आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. आठवडाभरात पुस्तक संच जिल्ह्यासाठी पाप्त होण्याची शक्यता असल्याचे उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी सांगितले.