जिल्ह्यातील शाळांना आजपासून दिवाळी सुट्टी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शाळांना दिवाळीसाठी 1 ते 14 नोव्हेंबरपर्यंत यापूर्वी सुट्टी जाहीर केलेल्या तारखेत पुन्हा बदल करण्यात 28 ऑक्टोबरपासून 10 नोव्हेंबपर्यंत नव्याने सुट्टी लागू करण्यात आली आहे.     

राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध धार्मिक सण आणि उत्सवांकरीता सुट्ट्या जाहीर करण्यात येत असतात. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. सन 2021-22 करीता रत्नागिरी जिह्यातील मराठी, उर्दू व खाजगी प्राथमिक शाळांच्या किरकोळ व मोठ्या सुट्टयांबाबत परिपत्रक प्रसिध्द करणेत आलेले आहे. या परिपत्रकाप्रमाणे दिवाळी सुट्टी 1 नोव्हेंबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.  परंतु या सुट्टी कालावधीत बदल करण्यात येउन नव्याने काढलेल्या शासन परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषदेचे नियोजना नुसार दिनांक 28  ऑक्टोबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दिवाळी सणाची शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी राहणार आहे. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.