रत्नागिरी:- जिल्ह्यात स्वच्छता सर्वेक्षणामध्ये 2012 पासून आजपर्यंत एकही ग्रामपंचायत लाल कार्डधारक ग्रामपंचायत आढळून आलेली नाही. त्यामुळे एकही पाण्याचा स्रोत दुषित नाही हे निश्चित झाले आहे.
शासनस्तरावरून देण्यात आलेल्या सुचनांनुसार दरवर्षी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा राबविण्याबाबत सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 1 ते 30 एप्रिल आणि 2 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत सर्व्हेक्षण करण्यात आले. या दोन्ही स्वच्छता सर्वेक्षणाचा उद्देश हा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची योग्य निगा राखणे, स्रोत आणि त्या सभोवतालचा परिसर, आतील परिसर स्वच्छ ठेवणे आहे. एप्रिल 2022 मान्सून पूर्व जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. स्वच्छता सर्वेक्षण माहे एप्रिल 2022 मध्ये आरोग्य विभागामार्फत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात करण्यात आले. एप्रिल 2022 च्या स्वच्छता सर्वेक्षणात 846 ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता. या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये चंदेरी कार्डधारक ग्रामपंचायती 821, पिवळे कार्डधारक ग्रामपंचायती 4 असून, हिरवे कार्डधारक ग्रामपंचायती 842 आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात स्वच्छता सर्वेक्षणात 2012 पासून आजपर्यंत एकही ग्रामपंचायत लाल कार्डधारक ग्रामपंचायत आढळून आलेली नाही.