जिल्ह्यातील आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी:- जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांसह चार पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या कोकण विभागाअंतर्गत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम, वाहतुक पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, सुदाम शिंदे यांचा समावेश आहे.

कोकण विभागाचे परिक्षेत्रीय उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री कोकणातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ग्रामीण, वाहतूक शाखेत गेले चार वर्षे कार्यरत असलेल्या अनिल विभूते यांची बदली रायगड येथे करण्यात आली आहे. तर ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांची बदली पालघर जिल्ह्यात करण्यात आली आहे. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांची पालघर येथे तर सुदाम शिंदे यांची बदली ठाणे येथे करण्यात आली आहे.

पुर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेल्या व सध्या पालघर येथे असलेले संजय आंबरे यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक विनीत कुमार चौधरी यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये कार्यरत असलेल्या चार पोलीस उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली असून त्यामध्ये दिलीप जाधव, दिपक कदम, गुणजी सकपाळ यांची रायगड येथे तर संतोष वालावलकर यांची बदली रायगड येथे करण्यात आली आहे. ठाणे येथे शांताराम महाले, पालघर येथील प्रमोद महेंद्रे, नजिब इनामदार यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिले आहेत.