जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले

जिल्ह्यात 24 तासात 156 पॉझिटिव्ह रुग्ण;  4 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. मागील 24 तासात 156 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 हजार 959 इतका झाला आहे. 

नव्याने 156 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 69 हजार 119 रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 213 रुग्णांपैकी आरटीपीसीआर चाचणी केलेले 57 तर अँटीजेन चाचणी केलेले 99 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

 24 तासात 694 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 64 हजार 515 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.