जिल्हा शल्य चिकित्सक कोरोना पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. 
 

मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण न सापडल्याने दिलासा मिळाला होता. मात्र रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. 
 

काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर या डॉक्टरच्या संपर्कात आल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यानी कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.