जिल्हा रुग्णालयातील गिझर मधून केवळ धूर; स्फोटाची अफवाच 

रत्नागिरी:- जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या प्रसुतीपश्चात विभागात गिझरचा स्फोट झालेला नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहय्यक अभियंता पूजा जाधव यांनी संबधीत गिझरची पाहाणी केल्यानंतर केवळ गिझरमधून धुर आल्याचे निष्पन्न झाले आहे. 

गुरुवारी पहाटे जिल्हा रुग्णालयातील प्रसुतीपश्चात विभागात सिझर झालेल्या महिलांना ठेवण्यात येते. नजात बालकांसह महिलाचे नातेवाईक तेथे असताता. गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास  एका महिलेची नातेवाईक आंघोळ  करण्यासाठी बाथरुममध्ये गेल्या होत्या. यावेळी गिझर सुरु केला. मात्र गिझरला पाणी पुरवठा करणार्या पाईपचा कॉक बंद असल्याने गिझरला पाणी पुरवठा झाला नाही. मात्र गिझरची कॉईल गरम झाल्याने गरम पाणी बाहेर पडणारा पाईप निघाल्याने त्यातून काहि प्रमाणात धुर आला. संबधित महिलेने यांची माहिती दिल्यानंतर कर्मचार्यांनी गिझरचा वीज पुरवठा बंद केला. यावेळी काहीकाळ वॉर्ड मध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र गिझरचा स्फोट झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रीक विभागाच्या सहय्यक अभियंत सौ.पूजा जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी केवळ गिझरचा एक पाईप निघून त्यातून साचलेला धूर बाहेर आल्याचे स्पष्ट झाले आहे. संबधीत पाईप पुन्हा जोडण्यात आला आहे. तर गिझर सुस्थितीत असल्याचेही तपासणीत स्पष्ट  करण्यात आले आहे. महिला प्रसुतीपश्चात विभागातील गिझर पुन्हा रुग्ण, नातेवाईकांसाठी सुरु आहे. रुग्णांनी घाबरुन जावू नये असे आवाहन जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे.