जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून भात लागवड 

कृषी संजीवनी मोहिमेची निवळीत सांगता

रत्नागिरी:-जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ‘कृषी संजीवनी’ मोहिमेची सांगता तालुक्यातील निवळी गावी गुरूवारी झाली. या कार्यकमात जि.प.अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी, तसेच अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. येथील शेतकऱ्यांना मसाला पिक लागवड व भातशेती लागवडीबाबत मोलाचे मार्गदशंन करण्यात आले.  
 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, कृषी समिती सभापती रेश्मा झगडे, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, तसेच पंचायत समिती सभापती नेहा माने, उपसभापती उत्तम  सावंत, सदस्य साक्षी  रावणंग, सरपंच वेदिका रावणंग यांची उपस्थिती होती. त्या कार्यकमावेळी मसाल्याच्या झाडांची लागवड व भात पिकाच्या लागवडीतील चारसूत्री पद्धतीने भात पिकाची लागवड याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच या कार्यक्रमांमध्ये मागील वर्षी भात पीक स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या जिह्यातील शेतकऱ्यांचा तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे पमुख डॉ. वैभव शिंदे यांनी भाजीपाला लागवड व मसाला पिके लागवड याबाबत लोकांना मार्गदर्शन केले. तसेच भात संशोधन केंद्र शिरगावचे प्रमुख विजय दळवी यांनी भात लागवड करताना घ्यावयाची काळजी तसेच नागली लागवड याचे पौष्टिक दृष्ट्या महत्त्व विशद करून लागवडीत येणाऱ्या अडचणी बाबत मार्गदर्शन केले.     

या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग ग्रामपंचायत निवळी यांच्या संयुक्त विद्यमाने व मंडळ कृषी अधिकारी पाली यातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. या कार्यक्रमाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी समाधान व्यक्त केले. कार्यकमाला निवळीचे उपसरपंच विलास गावडे तसेच नारळ संशोधन केंद्र भाट्येचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे, भात संशोधन केंद्र शिरगाव चे विजय दळवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चिखले मॅडम, जिल्हा विकास कृषी विकास अधिकारी अजय शेंड्ये, गटविकास अधिकारी जाधव , तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.